शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्राच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:17 IST

Manora News ३ जानेवारी रोजी मानोरा येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन मानोरा तालुक्यात असतानाही या ठिकाणी सीसीआयने यंदा कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादकांना नोंदणी करून शिलकीचा वाहनखर्च करीत कापूस  कारंजा किंवा मंगरुळपीर येथे न्यावा लागतो किंवा व्यापाºयांकडे कवडीमोल दरात विकावा लागतो. या पार्श्वभूमीवर वारंवार मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न केल्याने अखेर ३ जानेवारी रोजी मानोरा येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात शेतकºयांनी रास्तारोको आंदोलन केले. वाशिम जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत मानोरा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदाही मानोरा तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली होती.  जिल्ह्यात गत खरीप हंगामात २८ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. जिल्ह्यातील एकूण कपाशी क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र मानोरा तालुक्यातच होते. या पिकावर विविध नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने उत्पादनात घट आली असताना बाजारात व्यापाºयांकडून कवडीमोल दराने कपाशीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून वारंवार मानोरा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. तथापि, सीसीआयने मंगरुळपीर आणि अनसिंग येथे कापूस खरेदी सुरू केली, तर कारंजा येथे सीसीआयचे उपअभिकर्ता म्हणून फेडरेशनने कापूस खरेदी सुरू केली. शिवाय कामरगावातही फेडरेशनचे अतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु मानोरा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचारही करण्यात आला नाही. त्यामुळेच शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी दिग्रस चौकात रास्तारोको आंदोलन केले. यात महंत संजय महाराज,नामा बंजारा, महंत रमेश महाराज, शिवसंग्राम चे किशोर राठोड,प्रा.जय चव्हाण, गजानन पवार, धर्मा आडे आदि सहभागी झाले होते. तालुक्यातील १०१७ शेतकºयांची नोंदणी मानोरा तालुक्यात कपाशीची पेरणी सर्वाधिक असून, या तालुक्यात खरेदी केंद्र नाही. त्यातही तालुक्यातील १०१७ शेतकºयांनी मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत नोंदणी केली आहे. या शेतकºयांना मात्र कापूस विकण्यासाठी कारंजा किंवा मंगरुळपीर येथील केंद्रावर जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना वाहन खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराagitationआंदोलनFarmerशेतकरी