पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 10:39 AM2020-08-03T10:39:32+5:302020-08-03T10:39:52+5:30

पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाला.

Farmer dies after slipping and falling into well | पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
धनज बु. (वाशिम): पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना कारंजा तालुक्यातील धनज बु. येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या भामदेवी येथे २ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. शंकर केशव दारव्हेकर (६०), असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी विजय शंकर दारव्हेकर यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचे वडील शंकर केशव दारव्हेकर हे शेतातल विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले. यावेळी शेतात त्यांची पत्नी व मुलगा हे निंदण करीत होते. वडील विहिरीत पडल्याचे कळताच मुलगा प्रमोद दारव्हेकर याने मोठा भाऊ विजय यास वडील विहरीत पडल्याची माहीती दिली. त्यानंतर विजय दारव्हेकर यांनी गावातील लोकांच्या मदतीने वडिलांना विहिरीतून बाहेर काढले; परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून धनज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचर नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोकॉ रामेश्वर रामचवरे करीत आहेत.

Web Title: Farmer dies after slipping and falling into well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.