दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:58 IST2019-02-05T12:58:32+5:302019-02-05T12:58:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने शेतकरी भीमराव शेळके यांचा तसेच ...

farmer and driver killed in an accident | दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू!

दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू!

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने शेतकरी भीमराव शेळके यांचा तसेच गंभीर दुखापत झाल्याने वाहन चालकाचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना रिसोड तालुक्यातील सवडनजिक असलेल्या शासकीय वसतीगृहाजवळ सोमवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, अनिरुद्ध  भगवान शेळके व त्यांचा भाऊ भीमराव भगवान शेळके (रा.सवड) हे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात पिकांच्या राखणीकरिता चालले होते. यादरम्यान भरधाव वेगात आलेल्या एम.एच. ३७ पी १३६४ या क्रमांकाच्या दुचाकीने भीमराव शेळके यांना मागून जबरदस्त धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला; तर वाहन चालक राजकुमार सरकटे हा वाहनासह दुरपर्यंत घासत गेल्याने त्यालाही गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक भीमराव शेळके यांचा भाऊ अनिरुद्ध भगवान शेळके यांनी रिसोड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिभाऊ कुलवंत  करीत आहेत.

Web Title: farmer and driver killed in an accident