लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर युवकाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 17:27 IST2020-11-07T17:27:02+5:302020-11-07T17:27:11+5:30

Washim Crime News लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Exploitation of a young woman by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर युवकाचा अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर युवकाचा अत्याचार

 लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर  : एका १९ वर्षीय युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एक जणावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगरुळपीर शहरालगत असणाऱ्या पंचशील नगर येथील एका १९ वर्षीय युवतीने पोलिसांत तक्रार दिली की, २० वर्षीय आराेपी  ऋषिकेश भोंगळे ,रा अशोक नगर, मंगरुळपीर याने  लग्नाचे आमिष दाखवून पंचशील नगर, वाढा फार्म येथे  १५ मे २०१८ ते ४ ऑक्टाेबरपर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा फिर्यादी  आरोपीस भेटायला घरी गेली असता लग्न करत नाही म्हणून ,  पुन्हा घरी भेटायला आली किंवा फोन केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. पिडीत युवतीच्या या  तक्रारीवरून पोलिसांनी आराेपी  ऋषिकेश भोंगळे याच्याविरुध्द कलम ३७६(२),५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.
 
 

Web Title: Exploitation of a young woman by showing the lure of marriage