भारत नेट योजनेंतर्गत विनापरवानगी खोदकाम; शेतकऱ्यांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:39 PM2019-11-17T12:39:29+5:302019-11-17T12:39:35+5:30

फायबर आॅप्टीक केबल टाकण्यासाठी चक्क काही शेतकऱ्यांच्या शेतांमधून विनापरवानगी खांब टाकले जात आहेत.

excavation under Bharat Net Scheme; The loss of farmers! | भारत नेट योजनेंतर्गत विनापरवानगी खोदकाम; शेतकऱ्यांचे नुकसान!

भारत नेट योजनेंतर्गत विनापरवानगी खोदकाम; शेतकऱ्यांचे नुकसान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारत नेट योजनेच्या दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील ३४६ ग्रामपंचायतींना ‘हाय-स्पीड इंटरनेट’ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी मात्र फायबर आॅप्टीक केबल टाकण्यासाठी चक्क काही शेतकऱ्यांच्या शेतांमधून विनापरवानगी खांब टाकले जात आहेत. यामुळे शेतांचे नुकसान होत असून विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीत आहेत. दरम्यान, किनखेडा (ता.रिसोड) येथील काही शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत शनिवारी खांब उभारण्याचे काम बंद पाडले.
‘भारत नेट’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मंगरूळपीर तालुक्याला ‘हाय स्पीड इंटरनेट’ सुविधा पुरविण्यात आली असून दुसºया टप्प्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा आणि मानोरा या पाच तालुक्यांमधील ३४६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालये, आपले सरकार सेवा केंद्र, डिजिटल शाळा आदिंना सदोदित तथा गती असलेल्या ‘इंटरनेट’ची सुविधा पुरविली जाणार आहे. त्यानुषंगाने ‘नेटवर्क टर्मिनेशन डिव्हाईसेस’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स’ उपकरणे उपलब्ध करून देत ‘पॉर्इंट आॅफ प्रेझेन्स’ (पीओपी) स्थापित करण्यात येणार आहे. त्यासाठी काहीठिकाणी स्वतंत्र खांब उभारण्यात येत आहेत; परंतु यासाठी काहीठिकाणी पुर्वपरवानगी न घेता शेतांचा वापर केला जात असून नुकसान होत असल्याची बाब किनखेडा येथील काही शेतकºयांनी संबंधित कंपनीच्या निदर्शनास आणून दिली; मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर काही शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेऊन हे काम बंद पाडले.


किनखेडा परिसरातील शेतांमध्ये ‘स्टरलाईट टेक’ नामक कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने खांब उभारण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता हा केवळ ६.२९ मीटर असून त्यानंतर शेती क्षेत्र सुरू होत असताना संबंधित कंपनीच्या कामगारांकडून चक्क शेतांमध्ये खांब उभे केले जात आहेत. या गंभीर प्रकाराविरोधात शेतकºयांनी आता आक्रमक भुमिका अंगिकारली आहे.
- अनंत अवचार
शेतकरी, किनखडा (ता.रिसोड)


भारत नेट योजनेअंतर्गत फायबर आॅप्टीक केबल टाकणे, गरज असेल त्याठिकाणी खांब उभारण्याची कामे संबंधित त्या-त्या विभागांच्या रितसर परवानग्या घेऊनच सुरू आहे. काहीठिकाणी नाईलाजास्तव शेतांमधून खांब टाकावे लागत आहेत; मात्र त्यास विरोध होत आहे. अशावेळी सरपंच, सचिव, तलाठ्यांची मदत घेतली जात आहे.
- शेख जुनेद जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, महानेट

 

 

Web Title: excavation under Bharat Net Scheme; The loss of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.