शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:48 IST

पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजात वावरणाºया प्रत्येक नागरिकाने वनसाक्षरण होणे गरजेचे आहे. घराघरातून, शाळा-महाविद्यालयांमधून पर्यावरणाप्रती कर्तव्याचा संस्कार तळागाळात पोहचणे काळाची गरज आहे, याबद्दल आग्रही भुमिका ठेऊन कार्य करित असलेल्या मंगरूळपीर येथील पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

वृक्षलागवड वाढण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ?ज्याठिकाणी वृक्षलागवड करायची, तिथे पाण्याची मुबलक सोय असणे गरजेचे आहे. मातीचा थर वाहून गेलेल्या डोंगरावर तसेच खडकाळ जमिनीवर झाडे लावण्यासाठी व ती जगविण्यासाठी मृदा संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे माती अडवा, पाणी मुरवा, झाडे जगवा ही त्रिसूत्री असलेला मृदा जल व वन संवर्धन कार्यक्रम लोकसहभागातून राबविला तरच वृक्षलागवड यशस्वी होऊ शकते.

वनक्षेत्र घटल्याने कोणते दुष्परिणाम होतात ?शेती, शहरीकरण आणि रस्त्यांमुळे वनक्षेत्रात घट झाली आहे. निसर्गाची कार्बन पचविण्याची क्षमता देखील यामुळे घटली. कार्बन उत्सर्ग घटविण्याच्या आणि कार्बन क्षमता वाढविण्याच्या कार्यात वनस्पतीची भूमिका खात्रीशील व अल्पखर्चीक मानली जाते. त्यामुळे जंगले वाचविण्याचा जगभर प्रयत्न होत आहे. असे असले तरी जंगलाचे मुख्य मात्र कुणीही समजून घेत नाही. ते समजून घेतले तर जंगल संवर्धनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण अधिक सकारात्मक होईल.

जंगलाचे मुल्य म्हणजे काय ?लाकूड आणि लाकूडेत्तर वस्तूंचा पुरवठा, कार्बन शोषण आणि वन्यजिवांचा अधिवास याव्यतिरिक्त निसर्गाला जंगल परिसंस्थामधून अनेक जीवनावश्यक सेवा मिळतात. ज्या सेवामुळे पृथ्वीला सजीव सृष्टी पोसण्याची क्षमता प्राप्त होते. या सेवा जीवनावश्यक असून त्याचे मुल्यांकन झाले तरच लोकांना जंगलाचे महत्व कळणार आहे.

तुम्ही पर्यावरणविषयक करित असलेली कार्य कोणती ?पर्यावरणास पुरक व अनूकुल गावे, शहरे विकसीत होण्यासाठी तसा संकल्प करून घराघरात व शाळा-महाविद्यालयात, ग्रामपंचायत, महिला व युवा मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीचे काम केले जात आहे. त्यात पर्यावरण विषयक कार्यशाळा, निसर्ग सहली, निसर्ग शिबिरे, पर्यावरणाचे पुनरूज्जीवन, जैवविविधता संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश आहे.

समाजाकडून काय अपेक्षा आहेत ?प्रत्येक माणूस हा वनसाक्षर झाला पाहिजे, त्यासाठी नव्या व जुन्या पिढीत पर्यावरणाप्रती संस्कार रुजणे आवश्यक आहे. धर्म, राजकारण, अर्थकारणापेक्षाही अधिक महत्व पर्यावरणाला देणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येकाने याबाबत सजग असायला हवे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगलenvironmentपर्यावरण