शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:30 IST

पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शासन,  प्रशासनाच्यावतीने आवाहन करून विविध उपक्रम राबविण्यात येत अस ताना मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे गेल्या ५२ वर्षांपासून शाडूच्या  मूर्तीचा स्थापना करून पर्यावरण जपण्यासह एक गाव एक गणपतीची परं परा गावकर्‍यांच्यावतीने जपली जात आहे. यंदाही या ठिकाणी शाडूच्या मू र्तीची स्थापना करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देपर्यावरणाचा संदेशमंगरुळपीर तालुक्यातील चेहेलवासीयांचा आदर्श उपक्रम५२ वर्षांपासून एकच मूर्तिकार 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शासन,  प्रशासनाच्यावतीने आवाहन करून विविध उपक्रम राबविण्यात येत अस ताना मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे गेल्या ५२ वर्षांपासून शाडूच्या  मूर्तीचा स्थापना करून पर्यावरण जपण्यासह एक गाव एक गणपतीची परं परा गावकर्‍यांच्यावतीने जपली जात आहे. यंदाही या ठिकाणी शाडूच्या मू र्तीची स्थापना करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील चेहेल हे लहान लोकवस्तीचे गाव  आहे. या गावांत सर्वधर्माचे लोक एकोपा आणि सामंजस्याने सर्वच सणउ त्सव साजरे करतात. नवसाला पावणारा गणपती राजा म्हणून येथील गण पती ओळखला जातो. या ठिकाणी सर्वच सार्वजनिक उत्सवांप्रमाणे गेलय  ५२ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी मूर्तीची निर्मि ती शाडूच्या मातीपासून केली जाते. गेल्या ५२ वर्षांपासून गावकर्‍यांनी ही  परंपरा जपली आहे. गणेशोत्सवापूर्वी गावकरी चर्चा करून उत्सवात  आयोजित करण्यात येणार्‍या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करतात. म्हणून  असा उपक्रम राबविणारे चेहेल हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे.  आजवर या गावात गणेशोत्सवात एकदाही कोणत्याच कारणावरून वाद  झाला नाही. विशेष म्हणजे या उत्सवात गावांत सासरहून आलेली मुलगी  आणि जावयाचा सत्कार करण्याची परंपराही जपली जात आहे. दरवर्षी,  गणेशोत्सवात भागवत सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन  करणयात येते. यंदाही या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. या  निमित्त वाढोणा रामनाथ येथील हभप नारायण महाराज चौधरी यांचे  काल्याचे किर्तन आयोजि२त करण्यात आले असून, या कार्यक्रमानंतर  गणेशभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश  विसर्जनात सर्वधर्मिय सहभागी होऊन शांततेत गणरायाला दरवर्षी निरोप  देतात. 

५२ वर्षांपासून एकच मूर्तिकार चेहेल येथे गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करण्यासाठी  एकच मूर्तीकार मूर्ती बनविण्याचे काम गेल्या ५२ वर्षांपासून करीत आहेत.  मोतीभाऊ असे त्यांचे नाव असून, गणेशोत्सवापूर्वीच ते मूर्ती बनविण्याची  तयारी करतात. ही मूर्ती बनविण्यासाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी  लागतो. यासाठी मोतीभाऊ यांना गावकर्‍यांच्यावतीने योग्य ते सहकार्य  केले जाते. यापुढेही आपण हयात असेपर्यंत येथील मूर्ती बनविण्याची  जबाबदारी पार पाडू, असा संकल्प मोतीभाऊ यांनी केला आहे. त्यांनी  बनविलेली मूर्तीही आकर्षक असते. परिसरातील भाविकांसह मंगरुळपीर  तालुक्यातील शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन नवस कबूल  करतात आणि तो फेडण्यासाठीही नियमित येतात.