चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 16:41 IST2020-02-25T16:41:11+5:302020-02-25T16:41:39+5:30
पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले.

चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतजमिन मोजणीत एका गुंठ्याचा फायदा करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी स्थानिक उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयांतर्गत पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, शेतजमिन मोजणीसंबंधाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून तक्रारदारास नोटीस मिळाली. त्यावरून संबंधित जमिनीची मोजणी करण्यात आली. ती करताना निमतानदार केशव पुंडलिक नवघरे याने तक्रारदारास शेतात एका गुंठ्याचा फायदा करून दिल्याच्या मोबदल्यात लाच मागितली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून तपासणी केली असता, निमतानदार नवघरे याने पंचासमक्ष ४ हजार रुपयाची लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले. नवघरे यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शंकर शेळके यांनी दिली.