रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित

By Admin | Updated: December 17, 2015 02:36 IST2015-12-17T02:36:00+5:302015-12-17T02:36:00+5:30

२५२ पैकी १६३ पदांचा अनुशेष : ट्रॉमा केअर युनिट वा-यावर.

Emphasis on health service due to vacant positions | रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित

वाशिम : वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. २५२ पैकी तब्बल १६३ पदांचा अनुशेष असून, ट्रॉमा केअर युनिटमध्ये १५ पैकी केवळ तीन पदांची सेवा सुरू आहे. नागरिकांना संपूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रुग्णालयांत आवश्यक त्या अधिकारी-कर्मचार्‍यांची संख्याही निश्‍चित करण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २00 खाटांनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे भरण्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे; मात्र तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून सदर पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकित्सा), निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (भिषक), अस्थिरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, चर्मरोग तज्ज्ञ, क्षयरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, शरीरविकृती चिकित्सक अशी प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यांची (वर्ग एक) १६ पैकी तब्बल १३ पदे रिक्त आहेत. वर्ग-दोनच्या वैद्यकीय अधिकार्‍यांची १६ पदे मंजूर असून, दंत शल्यचिकित्सक व चार वैद्यकीय अधिकारी अशी पाच पदे रिक्त आहेत. वर्ग-३ मध्ये ८0 पदे मंजूर असून, अध्र्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

Web Title: Emphasis on health service due to vacant positions