रस्ता कामादरम्यान तुटल्या वीज तारा; २५ गावांचा विद्यूत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:35 IST2020-01-13T14:35:17+5:302020-01-13T14:35:24+5:30
एका वाहनावरील चालकाच्या चुकीमुळे शिरपूर-मालेगावदरम्यान मालेगाव सबस्टेशनजवळ विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या.

रस्ता कामादरम्यान तुटल्या वीज तारा; २५ गावांचा विद्यूत पुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : मालेगाव ते शिरपूर यादरम्यानच्या रस्ता कामासाठी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे विद्युत तारा तुटल्याने २५ गावांचा विद्यूत पुरवठा खंडित झाला. तसेच काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. हा प्रकार रविवार, १२ जानेवारीला सकाळच्या सुमारास घडला.
सद्या मालेगाव-शिरपूर-रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाकरिता मोठ्या स्वरूपातील वाहनांमधून गौणखनिज वाहतूक करण्यात येत आहे. त्यातील एका वाहनावरील चालकाच्या चुकीमुळे शिरपूर-मालेगावदरम्यान मालेगाव सबस्टेशनजवळ विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या. यामुळे शिरपूर, करंजी, अमानी, केळी, भेरा यासह परिसरातील २५ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. यासह वाहनेही जागीच ठप्प झाली. विद्युत तारा तुटल्याची माहिती मिळताच मालेगाव वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील तारा हटविल्या व वाहतूक सुरळित केली.
(वार्ताहर)