शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

काँग्रेसच्या आमदारांकडून दुष्काळी भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 2:32 PM

शेतकºयांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या असून, दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांची चमू १५ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, मुंगळा, काटा यासह मानोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या असून, दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली जाणार आहे. सध्या राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र विभागामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाराटंचाई तसेच रोजगाराचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या आमदारांची समिती विदर्भातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत आहे. १५ मे रोजी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मालेगाव तालुक्यातील मुंगळा, वाशिम तालुक्यातील काटा, मानोरा तालुक्यातील वापटी येथील दुष्काळी भागाची पाहणी केली. आॅरेंज व्हिलेज अशी ओळख असलेल्या मुुंगळा येथील शेतकºयांना सद्यस्थितीत भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा शेतकºयांनी मांडल्या. पाण्याअभावी संत्रा बागा सुकून जात आहेत. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व वादळवाºयामुळे संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही भरपाई मिळालेली नाही अशी आपबिती शेतकºयांनी मांडली. काटा परिसरातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याशी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली. रोजगाराअभावी जिल्ह्यातील मजुरांचे अन्यत्र स्थलांतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करावा अशा सूचनाही आमदारांनी केल्या. दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याकरीता शासनाला भाग पाडण्यासाठी हा दुष्काळी दौरा असल्याचे या समितीने सांगितले. या समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार विरेंद्र जगताप, आमदार रणजित कांबळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, समिती समन्वयक अतुल लोंढे आदींनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येचे उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमdroughtदुष्काळFarmerशेतकरीcongressकाँग्रेस