शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

वाशिम : दारू पिऊन वाहन चालविणे, वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होत नाही; तर अनेकवेळा लायसन्सचे ...

वाशिम : दारू पिऊन वाहन चालविणे, वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होत नाही; तर अनेकवेळा लायसन्सचे निलंबिनही केले जाते. गत चार वर्षांत जवळपास २१ जणांचे लायसन्स निलंबित करण्यात आले.

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकतो. अनेकजण वाहतूक नियमाचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते; याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणे, अपघातास कारणीभूत ठरणाºया चालकाचा परवानादेखील निलंबित केला जातो. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे वाहनचालकांसाठी आवश्यक ठरत आहे.

००००००

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन!

दारू पिऊन अथवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्यास (ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह) दंडात्मक कारवाई तसेच लायसन्स निलंबित करण्याबाबत वाहतूक शाखेकडून आरटीओकडे प्रस्ताव सादर केला जातो.

एखाद्या चालकाकडून अपघाताची घटना घडल्यास याप्रकरणातही चालक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. तीन महिने किंवा काही घटनांमध्ये अधिक कालावधीसाठी परवाना निलंबित होऊ शकतो.

०००००००००००००

अशी होते कारवाई

वाहतुकीचे नियम न पाळणाºया चालकाविरूद्ध परवाना निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव वाहतूक पोलीस शाखेकडून आरटीओकडे पाठविण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार आरटीओकडून विहित कालावधीसाठी परवाना निलंबनाची कारवाई करून वाहतूक शाखेकडे फाईल पाठविली जाते.

००००

चार वर्षातील कारवाई

२०१८ ०८

२०१९ ०७

२०२० ०२

२०२१ ०२

००००००००००००००००

प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे

कोट

रस्ते अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियम न पाळणा-या चालकाविरुद्ध वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, अपघात अशा घटनांतील चालक परवाना निलंबित करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठविला जातो. चालू वर्षात दोन प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

- नागेश मोहोड,

सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वाशिम