१० दिवसआड मिळतेय वाशिमकरांना पिण्याचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:17 IST2017-11-09T19:12:14+5:302017-11-09T19:17:50+5:30
वाशिम: शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबूर्जी जलाशयात आजमितीस २८ टक्के जलसाठा शिल्लक असून तो किमान एप्रिल २०१८ या महिण्यापर्यंत पुरावा, यासाठी नगर परिषदेकडून पुर्वनियोजन म्हणून सद्या १० दिवसआड पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे यांनी दिली.

१० दिवसआड मिळतेय वाशिमकरांना पिण्याचे पाणी!
ठळक मुद्देपालिकेचे पुर्वनियोजनएकबूर्जी जलाशयात उरला ३० टक्के जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहराला पाणीपुरवठा करणा-या एकबूर्जी जलाशयात आजमितीस २८ टक्के जलसाठा शिल्लक असून तो किमान एप्रिल २०१८ या महिण्यापर्यंत पुरावा, यासाठी नगर परिषदेकडून पुर्वनियोजन म्हणून सद्या १० दिवसआड पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे यांनी दिली.
एकबूर्जी जलाशयाची पूर्ण संचय पातळी १५१.९४ मीटर असून सद्या प्रकल्पात ३ द.ल.घ.मी. अर्थात २८ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. ते आगामी मार्च-एप्रिलपर्यंत पुरविण्याचे मोठे आव्हान सद्या वाशिम नगर परिषदेला पार पाडावे लागत असून १० दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.