पाणी उपलब्धतेबाबत मालेगाव, मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 09:03 PM2017-11-08T21:03:40+5:302017-11-08T22:09:31+5:30

वाशिम: जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मालेगाव आणि मंगरूळपीर हे दोन तालुके पाणी उपलब्धतेबाबत ‘डेंजर झोन’मध्ये असून ३६ पैकी तब्बल ११ सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण असल्याने रब्बी हंगामात नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. 

Malegaon, Mangurlpir 'Danger Zone' for water availability! | पाणी उपलब्धतेबाबत मालेगाव, मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्ये!

पाणी उपलब्धतेबाबत मालेगाव, मंगरूळपीर ‘डेंजर झोन’मध्ये!

Next
ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईचे संकेतरब्बीतही नापिकीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मालेगाव आणि मंगरूळपीर हे दोन तालुके पाणी उपलब्धतेबाबत ‘डेंजर झोन’मध्ये असून ३६ पैकी तब्बल ११ सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण असल्याने रब्बी हंगामात नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. 
मालेगाव तालुक्यात २१ सिंचन प्रकल्प असून ७ प्रकल्पांची पातळी शून्यावर पोहचली आहे. आजमितीस सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के पाणी शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया चाकातिर्थ लघूप्रकल्पाने निच्चांकी पातळी गाठल्याने अल्पावधीतच संपूर्ण शहराला पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून आजरोजी केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मंगरूळपीर शहरासह तालुक्याला अल्पावधीतच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखायला हव्या, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Web Title: Malegaon, Mangurlpir 'Danger Zone' for water availability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी