Disposal of water from Kalambeshwar Dam | कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय
कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतानाही, याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.
अवकाळी पावसाने बहुतांश धरणांमध्ये जलसाठा असून, त्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातील पाणी अवैधरित्या बाहेर सोडल्या जात आहे. या धरणातून पांगरी कुटे, एकांबा, खेरडी, कळंबेश्वर, डही आदी ठिकाणी लोक पिण्याकरता तसेच शेतीकरिता पाणी वापरतात. मात्र सध्या त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात कळंबेश्वर येथील शेतकरी ओम चतरकर, शंकर चतरकर, दत्तराव चतरकर, भागवत चतरकर, संतोष चतरकर, पुंजाजी नारायण चतरकर, सुनील शंकर गवई, विश्वास वानखडे, राजू डोके, शेषराव वंजारे, संतोष शिंदे, शालिक धनगर आदींनी कार्यालय गाठून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागले.
 

कळंबेश्वर धरणातील पाणी वाया जात असल्यासंदर्भात मला काही शेतकºयांकडून समजले. यासंदर्भात आम्ही प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन वाया जाणारे पाणी ताबडतोब बंद करू.
- आर.बी. तायडे
अभियंता लघु सिंचन उपविभाग

धरणातून पाणी वाया जात असल्याबाबत तेथील अधिकाºयांना वारंवार सूचना दिल्या असून अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही हालचाल त्यांनी केली नाही. पाणी असेच वाहत राहिले तर आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन करू.
-अनिता शंकर चतरकर
सरपंच, कळंबेश्वर

Web Title: Disposal of water from Kalambeshwar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.