अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:24+5:302021-09-10T04:49:24+5:30
वाशिम तालुक्यातील विळेगाव येथे असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याभोवती झालेली घाण व अतिक्रमण हटविण्यासाठी पिराजी हिवराळेे यांनी जिल्हा प्रशासनासह ...

अतिक्रमण हटविण्याची मागणी
वाशिम तालुक्यातील विळेगाव येथे असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याभोवती झालेली घाण व अतिक्रमण हटविण्यासाठी पिराजी हिवराळेे यांनी जिल्हा प्रशासनासह सर्व संंबंधितांना अनेकवेळा निवेदने दिली आहेत. महात्मा फुलेंच्या पुतळ्याभोवती असलेल्या घाणीमुळे ग्रामस्थांना पुतळ्याचे पूजन करता येत नाहीत. तसेच अतिक्रमणामुळे पुतळ्याचे अस्तित्वच धोक्यात येत आहे. त्यामुळे पुतळ्याभोवती असलेले अतिक्रमण काढून घाण व दुर्गंधी साफ करावी अशी मागणी हिवराळे यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली. मात्र त्यांच्या निवेदनावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. पिराजी हिवराळे यांच्या तक्रारी संदर्भात विभागीय आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन विळेगाव येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण व साफसफाई बाबत कार्यवाहीसाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ९ जून रोजी पत्र दिले होते. मात्र विभागीय आयुक्तांच्या या पत्रावर जि.प. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप हिवराळे यांनी केला.