शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रियेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या होत्या. या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया विभागही जवळपास बंदच होते. नेत्र शस्त्रक्रियांचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी गटांतील असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यापासून सरकारी रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाले असून, नेत्रशस्त्रक्रियाही सुरू झाल्या. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी महिन्यापासून नेत्रांशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांची रांग लागत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान नेत्रशस्त्रक्रिया ठप्प असल्याने नेत्रशस्त्रक्रियांत मोठी घट आल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये सरकारी रुग्णालयात १,३०० नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तर २०२० मध्ये केवळ ११० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

०००

या कारणांमुळे ठप्प होत्या शस्त्रक्रिया

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात आरोग्य विभागानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्याचा फटका जिल्ह्यातील नेत्र रुग्णांनाही बसल्याचे दिसून येते. नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित, तसेच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको, म्हणून कोरोनाकाळात नेत्रशस्त्रक्रिया विभाग जवळपास बंदच होता.

०००

कोरोनाकाळात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा व्यस्त होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने नेत्रशस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाला आहे. नेत्राशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील नेत्र विभागाशी संपर्क साधावा.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

००

१,३००

२०१९ मधील नेत्र शस्त्रक्रिया

०००

११०

२०२० मधील नेत्र शस्त्रक्रिया