नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर मार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:53 PM2019-01-11T12:53:08+5:302019-01-11T13:00:45+5:30

शेलूबाजार ( वाशीम ) : नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील जि .प. शाळेजवळ कंझरा येथील १७ वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या युवकाला एम .एच .३४ एबी ७८८३ या क्रमांकाच्या ट्रेलरने  चिरडल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताचे दरम्यान घडली .

Death of youth in an accident on the Nagpur-Aurangabad Highway | नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर मार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर मार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार ( वाशीम ) : येथून गेलेल्या नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गावरील जि .प. शाळेजवळ कंझरा येथील १७ वर्षीय सागर लक्ष्मण ठणठणकार या युवकाला एम .एच .३४ एबी ७८८३ या क्रमांकाच्या ट्रेलरने  चिरडल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताचे दरम्यान घडली . या घटनेनंतर नागपुर - औरंगाबाद दृतगती मार्गावर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले . १० वाजेपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे नागपुर औरंगाबाद व मंगरुळपीर अकोला मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. दिड महिन्यापुर्वी २५ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी एका युवकाचा ट्र्क अपघातात मृत्यू झाला होता , ती घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच घटनास्थळावर निष्पाप युवकाचा बळी गेला असल्याने शेलूबाजार येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे . वारंवार घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी प्रशासन केवळ आश्वासन देत असल्याने ग्रामस्थांनी स्थानीक चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.त्या घटनेच्यावेळी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनच्यावेळी गावातून जाणार्‍या मार्गावर ठिक ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते ,परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा वळण मार्गाचा प्रश्न निकाली निघाला नाही. १० वाजेपासून अपघातात मृत्यू झालेल्या सागरचे आई, वडील, नातेवाईक नागरिक चौकात ठाण मांडून बसले होते. आंदोलन सुरु असतांनाच घटनास्थळावरुन मृतदेह घेवून पोलीसाची गाडी चौकातून जात असतांना आंदोलकांचा रोद्ररुप पहावयास मिळाला . हेच नव्हे तर ज्या ट्रेलरने अपघात झाला तो ट्रेलर घटनास्थळावरुन हटवून चौकात आणल्या गेले तेव्हा  परिस्थीती बिघडली होती. नागरिकांनी त्या ट्रेलरच्या टायरची हवा काढून टाकली. सोबत दृतगती मार्गावरुन जाणार्‍या पोलीस व्हॅनला आंदोलकाचा सामना करावा लागला. मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार जायभाये यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला ,परंतु आंदोलक समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. अडीच तासापासून आंदोलन सुरु असल्याने शाळकरी मुलाचे व रुग्नांचे वाहने वगळता सर्वच वाहने अडकूनल पडली आहे.

Web Title: Death of youth in an accident on the Nagpur-Aurangabad Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.