शेलुबाजार-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:57 IST2018-02-06T14:55:59+5:302018-02-06T14:57:32+5:30

Death of a wounded youth | शेलुबाजार-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातातातील जखमीचा मृत्यू

शेलुबाजार-वाशिम मार्गावर दुचाकी अपघातातातील जखमीचा मृत्यू

ठळक मुद्देशेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झाली. यात धनंजय साखरे (वय २२, रा.गोग्री) आणि उमेश देशमुख (वय २५, रा.पेडगाव) हे दोन युवक ठार झाले. तर विकास ढगे आणि ज्ञानेश्वर कर्णे हे दोघे गंभीर जखमी झाले.

शेलुबाजार : शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजी दोन दुचाकींच्या   अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झाली. यात धनंजय साखरे (वय २२, रा.गोग्री) आणि उमेश देशमुख (वय २५, रा.पेडगाव) हे दोन युवक ठार झाले; तर विकास ढगे आणि ज्ञानेश्वर कर्णे हे दोघे गंभीर जखमी झाले.
दोन दुचाकींची समारोसमोर धडकेत जखमी झालेल्या विकास ढगे यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. गत दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी रात्री दिड वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात ठार झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. 

Web Title: Death of a wounded youth