Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 10:34 AM2021-05-19T10:34:37+5:302021-05-19T10:34:44+5:30

Corona Cases in Washim : मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

The death of one; 437 newly infected, 469 discharged | Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज

Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असला तरी मंगळवारी दिलासादायक आकडे समोर आले. नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक असल्याने जिल्हावासीयांना किंचितसा दिलासा मिळाला. मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे ४६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. सलग दुसऱ्या दिवशीही नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी ४३७ नवीन रुग्ण आाढळले तर ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मालेगाव, रिसोड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर सर्वात कमी रुग्ण कारंजा तालुक्यात ४५ आढळून आले. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानादेखील अनेकांना गृहविलगीकरणात ठेवण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. 
एकाच घरात कोरोना रुग्ण आणि इतर सदस्य राहत असल्याने त्यांनाही संसर्ग होत असल्याचे बोलले जात आहे. 
त्यामुळे ग्रामीण भागात गृहविलगीकरणाला परवानगी देताना प्रत्यक्ष पडताळणी केली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. याकडे तालुकास्तरीय यंत्रणेने लक्ष द्यावे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे. 
(प्रतिनिधी)
 

Web Title: The death of one; 437 newly infected, 469 discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.