शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचा-यांची ‘दांडीयात्रा’

By admin | Updated: February 5, 2015 01:17 IST

वाशिम पंचायत समितीमधील प्रकार; दहा कर्मचारी गैरहजर.

धनंजय कपाले /वाशिम:येथील पंचायत समिती कार्यालयामधील बहुतांश कर्मचारी कोणाचीही परवानगी न घेता सामुदायीकरीत्या दांडी यात्रेवर असल्याचे सभापती वीरेंद्र देशमुख यांनी आज (दि. ४) सकाळी ९:४५ वाजताचे दरम्यान केलेल्या पंचनाम्यामधून उघडकीस आले. विनापरवानगी गैरहजर असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिले. पंचायत समितीचे सभापती विरेंद्र देशमुख यांनी १३ जानेवारी २0१४ रोजी पंचायत समितीमध्ये कर्तव्यावर असलेले काही कर्मचारी दांडी मारतात तर काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब उघडकीस आणली होती; मात्र त्यावेळी कर्मचार्‍यांना तोंडी तंबी देऊन माफ केले होते. त्यानंतर काही दिवस कर्मचारी वेळेवर हजर राहत होते. पुन्हा काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या सवईप्रमाणे उशिरा येणे, दांडी मारणे, दौरा दर्शवून वैयक्तिक कामे करणे असे प्रकार सुरू केले. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अशा वागणुकीमुळे पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या अनुषंगाने सभापती देशमुख यांनी आज ४ फेब्रुवारी रोजी सकाळी 0९:४५ वाजता अचानक पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी केलेल्या झाडाझडतीमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात गैरहजर असल्याचे आढळून आले. सकाळी १0 वाजता ३५ कर्मचार्‍यापैकी १0 कर्मचारी गैरहजर होते. लगेचच सभापती देशमुख यांनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांना पंचायत समितीमधील प्रकार प्रत्यक्ष बघण्यासाठी भेट देण्याची विनंती केली.अधिकारी जवादे यांनी तत्काळ पंचायत समितीला भेट दिली असता अनेक गंभीर बाबी त्यांना हजेरी रजिष्टर व हालचाल रजिस्टरवर आढळून आल्या. सभापती देशमुख व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवादे यांनी सकाळी ११:३0 वाजेपयर्ंत किती अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून कार्यालयामध्ये हजर होतात, याची वाट पाहिली. हळूहळू आपल्या सवईप्रमाणे अधिकारी व कर्मचारी कार्यालयामध्ये येऊ लागले. या सवार्ंची सभापती देशमुख व अधिकारी जवादे यांनी चांगलीच कानउघाडणी केली.