शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

वर्षभरात २५० रुपयांनी वाढला सिलिंडर; सबसिडी मात्र कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. ...

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वांत जास्त वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात ७२४.५० रुपये दराने गॅस मिळत होता. तर मार्च महिन्यात हाच दर ८२४.५० रुपये झाला. एकाच महिन्यात सरकारने या दरात १०० रुपयांची वाढ केली आहे, तर वर्षभरात सिलिंडर ३०० रुपयांनी महागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गॅससोबतच इतर इंधनांच्या दरातदेखील सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे. गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरदेखील वाढतच आहेत.

------------------

आता पुन्हा चूल पेटवायची का?

सरकारने उज्ज्वला योजनेत सामान्यांसाठी गॅस कनेक्शन मोफत दिले. त्यानंतर गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली. आधी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. नंतरच्या काळात ही सबसिडीदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन घेतले, त्यांच्या घरात आता पुन्हा चूल पेटवायची वेळ आली आहे. कारण गरीब घरांमध्ये ८५५ रुपये दराने गॅस परवडेल कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे,

----------------

असे वाढले दर

महिना सिलिंडरचे दर सबसिडी

जुलै २०२० - ५९९.५० --

ऑगस्ट - ५९९.५० --

सप्टेंबर - ५९९.५० --

ऑक्टोबर - ५९९.५० --

नोव्हेंबर - ५९९.५० ०४

डिसेंबर -६४९.०० ०४

जानेवारी २०२१ -६९९.५० ०४

फेब्रुवारी -७२४.५० ०३

मार्च -८२४.५० ०३

एप्रिल -८१४.५० ०३

मे -८१४.५० ०३

जून -८१४.५० ०४

जुलै -८५५.०० --

-----------------------------

प्रतिक्रिया

शहरात चूलही पेटविता येत नाही.

१) कोट: सिलिंडर आणि जीवनाश्यक वस्तूंची होणारी दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय झाला आहे. भाजीपाला, पेट्रोलच्या भाववाढीने त्यात भर टाकली आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले. त्यात शहरात चूलही पेटविता येत नसून, सरकार भाववाढ करून समस्या अधिकच वाढवत आहे.

- संगीता मोरे, गृहिणी

-----------------------

२) कोट: सिलिंडरच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवून सरकार सर्वसामान्यांवर दडपण आणत आहे. सर्व वस्तूंच्या दरवाढीने गृहिणी त्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला गॅस खरेदी करताना वस्तूंचे दर वाढलेले असतात. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आता चूल पेटवावी कोठे, असा प्रश्न आहे.

- शबनम परसूवाले, गृहिणी