मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:30 IST2021-02-08T17:30:02+5:302021-02-08T17:30:19+5:30
Malegaon Nagar Panchayat नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने ते पदमुक्त झाले आहेत

मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता
मालेगाव : पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने मालेगाव नगर पंचायत येथे प्रशासक म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे.
७ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने ते पदमुक्त झाले आहेत. आता नगर पंचायतवर प्रशासकाची नियुक्ती निश्चित मानल्या जात आहे. पदमुक्त झालेल्या या नगरपंचायतचा कारभार प्रशासकाकडे गेला नसून प्रशासक पदी अद्यापपर्यंत कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या पदासाठी आता कुणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता दिसत आहे. सदोष प्रभागरचना व आरक्षणामुळे नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. स्थगितीमुळे नगर पंचायतची निवडणूकही लांबणीवर पडली असल्याने आता या नगरपंचायतवर शासनाला प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. मुदत संपल्याने विद्यमान नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार की प्रशासक म्हणून नियुक्ती होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.