पीके गेली पाण्याखाली; शेतकरी आर्थिक ओझ्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 05:44 PM2021-09-29T17:44:59+5:302021-09-29T17:46:13+5:30

Crop loss due to Rain : सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पाण्याखाली गेल्याने आता आर्थिक ओझ्याखाली दबावे लागणार, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.

Crop loss due to Rain ; Farmers under financial burden! | पीके गेली पाण्याखाली; शेतकरी आर्थिक ओझ्याखाली!

पीके गेली पाण्याखाली; शेतकरी आर्थिक ओझ्याखाली!

Next
ठळक मुद्देनुकसानभरपाई केव्हा मिळणार? सोयाबीनला सर्वाधिक फटका

वाशिम : गत पाच दिवसांतील संततधार पावसाने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पाण्याखाली गेल्याने आता आर्थिक ओझ्याखाली दबावे लागणार, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.
सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या सोंगणीच्या वेळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदा जिल्ह्यात तीन लाख चार हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा बाळगली असतानाच, ऐन सोंगणीच्या हंगामात बरसलेल्या पावसाने शेतकºयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. जवळपास एक लाख हेक्टरवरील सोयाबीनला जबर फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, बुधवार दि.२९ सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वेक्षणाच्या कामाला गती आल्याचा दावा प्रशासनाने केला. हातातोंडाशी आलेला शेतमालांचा घास पावसाने हिरावल्याने आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचा सूर शेतकºयांमधून उमटत आहे.

Web Title: Crop loss due to Rain ; Farmers under financial burden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app