शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या डाळिंब उत्पादकांच्या व्यथा!

By admin | Updated: December 24, 2015 02:43 IST

फळबागांसाठी पाणी मिळण्याची शेतक-यांची मागणी.

मंगरुळपीर (जि. वाशिम): जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंगरुळपीर येथील शेतकरी प्रतापराव बाबरे यांच्या वाढा शिवारातील डाळिंब बागेला २२ डिसेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली असता, उपस्थित शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मंगरुळपीर येथील शेतकरी बाबरे यांच्या वाढा शिवारातील १२ एकर डाळिंब बागेला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या भेटीदरम्यान पॅकिंग हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत त्या विनाविलंब निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे यांना दिल्या. डाळिंबाची उत्कृष्ट दर्जाची फळे असतानाही त्यास केवळ ४६ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी खंत व्यक्त केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेचा लाभ प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना मिळाला तर बारमाही फळबागेचे उत्पादन घेता येईल. यासह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची २ हेक्टर र्मयादेची अट शिथिल झाली तर सीताफळ या पिकास जिल्ह्यामध्ये लागवड होण्यास भरपूर वाव मिळेल, ही बाब उपस्थित शेतकर्‍यांनी यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. सोबतच कोणत्याही फळ पिकास प्लास्टिक मल्चिंग असल्यास त्याव्दारे पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी मात्र शासनाने पुरेसे अनुदान द्यायला हवे. शेजारी जिल्ह्यांमध्ये मल्चिंग योजनेला अनुदान मिळते; मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखविली. यावेळी प्रतापराव बाबरे, सतीश बाबरे, प्रमोद बाबरे, विनोद बाबरे, बाळु पाटील गावंडे, देवलाल ठाकरे, प्रवीण ठाकरे, मंगळसा ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत पाकधने, शंकरराव सावके, यशवंत धोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.