आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचा आलेख चढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:00 PM2021-01-02T16:00:51+5:302021-01-02T16:18:28+5:30

Police Station, Crime News गुन्ह्यांच्या कारणांमध्ये कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी हे एक महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसत आहे.  

Crime graph rises under Asegaon police station | आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचा आलेख चढता

आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचा आलेख चढता

googlenewsNext
ठळक मुद्देआसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५२ गावांचा समावेश होतो. २०२० मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे अधिकृत माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे या संदर्भातील अधिकृत माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विनयभंग, महिला अत्याचार, हत्या, हत्येच्या प्रयत्नांसह घरफोडी आणि हाणामारीच्या घटनांत प्रामुख्याने लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
मंगरुळपीर पोलीस उपविभागांतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५२ गावांचा समावेश होतो. या गावांत कोरोना लॉकडाऊन काळातच गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार २०१९ या वर्षात आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्या,  हत्येचा प्रयत्न १, महिला अत्याचाराची १, घरफोडी १, चोºया ४, दंगे २, फूस लावून पळविल्याच्या ५, हाणामारीच्या २७, विनयभंग २, अपघाती मृत्यू १, महिला छळाच्या ९, जुगार ५२, अवैध दारूविक्री १४५, तर इतर गुन्ह्यांच्या ४८ घटना घडल्या. या उलट २०२० मध्ये त्यात ३५ टक्के वाढ होऊन २ हत्या,  हत्येचा प्रयत्न ३, महिला अत्याचार २, जबरी चोरी १, घरफोडी ३, चोºया २, दंगे ६, फूस लावून पळविल्याच्या ३, हाणामारीच्या ५८, कर्मचाºयांवर हल्ला ३, विनयभंग ११, अपघाती मृत्यू ४, महिला छळाच्या १२, जुगार ५६, अवैध दारूविक्री १५०, तर इतर गुन्ह्यांच्या ७४ घटना घडल्या. प्रामुख्याने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.  

पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत ५२ गावांतील गुन्ह्यांचा विचार करता केवळ पोलीस स्टेशनचे मुख्यालय आसेगाव वगळता इतर सर्वच गावांत लहान मोठे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत. गुन्ह्यांच्या कारणांमध्ये कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी हे एक महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसत आहे.  
-किशोर खंडार,
पोलीस उपनिरीक्षक आसेगाव

Web Title: Crime graph rises under Asegaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.