गत दोन महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पात्र लाभार्थ्यांना देण्याचे काम पोहा प्राथमिक आरोग्य
केंद्रांतर्गत येत असलेल्या काजळेश्वर येथे आरोग्य पथक काजळेश्वर करीत आहे . गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, गाव कोरोना मुक्त रहावे करिता लसीकरणाबाबतची जनजागृती आरोग्य विभाग , ग्रा.पं. प्रशासन , शिक्षक , अंगणवाडी, आशा सेविका करीत आहेत . त्यानुसार कोविशिल्ड लसीकरण शिबिर ४ जून रोजी प्राथमिक शाळेत घेण्यात आले . यामध्ये ४५ वर्षांवरील ज्यांना ८४ दिवस पूर्ण झाले अशा लाभार्थ्यांना आणि ४५ वर्षांखालील फ्रंटलाईन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. याकरिता आरोग्य अधिकारी डॉ. गावंडे , आरोग्य सेविका योगिता वानखडे , मंजू जाधव , कैलास पा .उपाध्ये , निकेत उपाध्ये यांचे याेगदान लाभत आहे. त्या कोणत्याही अफवांना बळी न पडता पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी किरण जाधव यांनी केले.