भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाहीच - निवृत्ती बोऱ्हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:49 IST2019-04-27T19:47:20+5:302019-04-27T19:49:04+5:30
सुनील काकडे वाशिम : प्रशासकीय सेवेत कार्यरत सर्वच विभागातील लोकसेवकांनी नागरिकांची कामे करताना लाच मागणे, हा मोठा गुन्हा आहे. ...

भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाहीच - निवृत्ती बोऱ्हाडे
सुनील काकडे
वाशिम: प्रशासकीय सेवेत कार्यरत सर्वच विभागातील लोकसेवकांनी नागरिकांची कामे करताना लाच मागणे, हा मोठा गुन्हा आहे. अशा लोकसेवकांसह अपसंपदा गोळा करणाºया अन्य लोकांविरूद्ध तक्रार प्राप्त झाल्यास लाचलुचपत विभागाकडून विनाविलंब कारवाई केली जाते. त्याचे स्वरूप तथा तत्संबंधीच्या अन्य विषयांवर या विभागाचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोºहाडे यांच्याशी साधलेला संवाद...
गत पाच वर्षांत किती कारवाया झाल्या, लाचलुचपत विभागाचे कार्य कसे चालते?
वाशिमच्या लाचलुचपत विभागाने गत पाच वर्षांत ६५ कारवाया केल्या आहेत. लोकांच्या प्राप्त होणाºया तक्रारींची तत्काळ दखल घेवून सापळा रचणे, पडताळणी करून संबंधित लोकसेवक अथवा चुकीच्या मार्गाने अपसंपदा गोळा करणारा सर्वसामान्य माणूस किंवा लोकप्रतिनिधी अशा सर्वांवर कारवाई करण्याचा अधिकार लाचलुचपत विभागाला आहे.
कोर्टकचेरीच्या ससेमिºयामुळे नागरिक तक्रार द्यायला धजावत नाहीत, याबाबत काय सांगाल?
आता स्थिती पुर्वीसारखी राहिलेली नाही. गुन्हेगारांविषयीची माहिती देणाºया नागरिकांची नावे गुप्त ठेवले जाते. तक्रारदारास किमान १ ते २ वेळा कोर्टात साक्ष द्यायला यावेच लागते, पण समाजातील भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी हे आवश्यक आहे. नागरिक जागृत झाले तर परिस्थिती सुधारायला वेळ लागणार नाही.
लाच मागण्याची तक्रार केवळ लोकसेवकाविरूद्धच असावी का?
नाही. प्रशासकीय विभागांतर्गत कार्यरत सर्व लोकसेवकांसोबतच राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि भ्रष्टाचार करून अपसंपदा जमविणारे सर्वसामान्य नागरिकही कारवाईस पात्र आहेत. विशेष म्हणजे साध्या कागदावर तक्रारदाराने दिलेल्या अर्जाची दखल घेवून चोख चौकशी करून कारवाई केली जाते.
तक्रार कुठे व कशी करता येईल?
एखादा शासकीय नोकर अथवा लोकप्रतिनिधीने कायदेशीर मागाने मिळालेल्या उत्पन्नापेक्षा अधिक स्थावर व जंगल मालमत्ता जमविली असल्याची तक्रार केली जावू शकते. एखाद्या व्यवहारात शासकीय नोकर, लोकसेवक, लोकप्रतिनिधी, विश्वस्त आदिंनी शासनाचा पैसा गैरमार्गाने खर्च केला किंवा बनावट व्यवहार केला तर त्याची तक्रारही करता येते. ‘वेबसाईट’वर आॅनलाईन तसेच ‘एसीबी’ कार्यालयांमध्येही तक्रार करता येते. त्याची तत्काळ दखल घेतली जाते.