Coronavirus : वाशिम जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:03 IST2020-03-13T14:03:27+5:302020-03-13T14:03:43+5:30
इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्हाशल्यचिकित्सकांची नियुक्ती, तर संनियंत्रक म्हणून सर्व विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

Coronavirus : वाशिम जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढणण्याची शक्यता लक्षात घेता. या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी पूर्वतयारी व प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी कृती आराखडा तयार केला आहे. यात इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्हाशल्यचिकित्सकांची नियुक्ती, तर संनियंत्रक म्हणून सर्व विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने कोरोना विषाणू नियंत्रणासाठी विस्तृत नियोजन या प्राधिकरणचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याची पूर्व तयारी व प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक, तर जिल्हा आरोग्य अधिकाºयांना संनियंत्रक म्हणून घोषीत करतानाच गृहविभागाकडून संनियंत्रक म्हणून पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाकडून जिल्हा शल्यचिकित्सक, नगर पालिकाविभागाकडून सर्व मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाकडून सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार, अन्न व औषध प्रशासनाकडून सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, औद्योगिक सुरक्षा, शिक्षण, विपश्यना केंद्र व इतर सेवाभावी संस्थांचे विभाग प्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आरोग्य आणि गृहविभागांतर्गत संनियंत्रकांच्या जबाबदाºया
गृह विभागांतर्गत संनियंत्रक अधिकारी म्हणून पोलीस अधिकाºयांना कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून अफ वा, गैरसमज पसरविणाºयांवर योग्य कार्यवाही करणे, अफवांवर नियंत्रण ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक जनजागृती, परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेल भारतीय नागरिकांबाबत पोलीस स्टेशन प्रभारी यांना माहिती वेळोवेळी देण्याच्या सुचना, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम, आयोजित करणाºयांना कार्यक्रम स्थगित करणे किंवा पुढे ढकलण्याबाबत सुचना करणे आदी जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागांतर्गत संनियंत्रक म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के (वाशिम@रेडिफमेलडॉटकॉम), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर (धोवास@रेडिफमेलडॉटकॉम) यांना कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघू कृती प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये म्हणून उपाय योजना आखणे, आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शन सुचनांचे तंतोतंत पालन करणे, स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवणे, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था, कोरोना विषाणूण संसर्गाबाबत जनजागृती करणे, कोरोना विषाणू संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राीच स्थापना करणे, टोल फ्री क्र मांक १०४ कार्यान्वित करणे, जिहा माहिती अधिकाºयांमार्फत राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-२६१२७३९४ या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, खासगी डॉक्टरांची सेवा अधिगृहीत करणे, खासगी हॉस्पिटमधील साधनसामुग्र अधिग्रहीत करणे आदि