शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:36 IST

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८७ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी रात्री एका व्यक्तीचा, तर शुक्रवारी दिवसभरात १७ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८७ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ८३ जणांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. गुरुवारी ९ जुलै रोजी यामध्ये २१ जणांची भर पडली होती. त्यात गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील इंदिरानगर भागातील एका २९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शुक्रवार १० जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता जिल्ह्यातील ८ व्यक्तींचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर परिसरातील ४ वर्षीय मुलगी, ५४ वर्षीय महिला, सोनखास परिसरातील ३१ वर्षीय महिला, गवळीपुरा परिसरातील ३० वर्षीय व बढाईपुरा परिसरातील ४९ वर्षीय व्यक्ती अशा एकूण ५ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्याशिवाय कारंजा शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, आनंद नगर परिसरातील ५२ वर्षीय महिला व २ वर्षीय मुलगीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याशिवाय सायंकाळी ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ०५ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मालेगाव शहरतील जिल्हा परिषद मराठी शाळा परिसरातील ०३ आणि नागरतास रोड परिसरातील ०१ व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८७ झाली असून, यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८३ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आता कालपर्यंतच्या ११० अहवालातील काही अहवाल गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी प्राप्त झाले, तर उर्वरित अहवालाकडे आरोग्य विभागांचे लक्ष लागले आहे.मालेगावातील व्यक्तीचा अकोल्यात मृत्यूमालेगाव शहरातील अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मालेगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मालेगाव नगरपंचायत चे ३ कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने संपूर्ण नगर पंचायतचे कर्मचाऱ्यांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. मालेगाव शहरात कोरोना पॉझिटीव्ह संख्या ८ झाली आहे.तीन दिवसात ३९ अहवाल पॉझिटीव्हगेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३९ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संबंधित परिसरात प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावून नागरिकांचे सर्र्वेक्षण सुरू केले आहे. त्यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ८ व्यक्तींसह गुुरुवारी रात्री पॉझिटिवह आढळून आलेल्या एका व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील लोकांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्सचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या