CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात स्थलांतरीत कामगारांच्या माहितीसाठी घरोघर भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:58 IST2020-03-21T11:57:39+5:302020-03-21T11:58:43+5:30
पोलीस पाटलांनी महानगरांतून परत गावी आलेल्या कामगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले.

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात स्थलांतरीत कामगारांच्या माहितीसाठी घरोघर भेटी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परदेश, महानगरातून गावी परतलेल्या नागरिक, कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण़्याची शक्यता असल्याने या नागरिक, कामगारांची माहिती संकलित करण़्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक पोलीस पाटील आणि ग्रामसेवक घरोघर फिरून कामगारांची माहिती घेत असल्याचे, तसेच स्थलांतरीत कामगारांना तपासणी व माहितीचे आवाहन करण्यासाठी ग्रामपंचायतकडून दवंडी देण्यात येत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले
महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ६ (१) अन्वये पोलीस पाटील हे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काम करतील, असे नमूद आहे. कलम ६ (३) अन्वये गावातील सामाजिक स्वास्थ्य व त्याच्या सर्वसाधारण परिस्थितीविषयी अशा कार्यकारी दंडाधिकाºयांना नियमितपणे माहिती देणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नोवेल कोरोना १९ या विषाणूच्या संसगार्चे प्रमाण महाराष्ट्रात दिसून येत असून, परदेशात गेलेल्या नागरिकांसह पुणे व मुंबई या सारख्या महानगरातून गावाकडे परत येणाºया ईसमांना नोवेल कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याने परदेशातून, तसेच मुंबई, पुणे, अशा महानगरातून परत आलेल्या नागरिकांची माहिती तालुक्याचे तालुका दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकाºयांना कळविण्याचे आदेश पोलीस पाटलांना देण्यात आले आहेत, तसेच सदरची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांसह निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या ईमेल आयडीवरही कळविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परतलेल्या स्थलांतरीतचा पूर्ण नाव, पत्ता, कोठे उतरला त्याचे ठिकाण, गाडी कोण्या शहरातून आली, त्या गावाचे, शहराचे नाव, आदि माहिती पोलीस पाटलांना घ्यावी लागत असून, या आदेशानुसार शुक्रवार जिल्हाभरातील पोलीस पाटलांनी महानगरांतून परत गावी आलेल्या कामगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले.
सहाशेहून अधिक लोकांची माहिती संकलित
महानगरातून गावी परत येत असलेल्या नागरिकांची इत्तंभूत माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाºयांनी पोलीस पाटलांना दिल्यानंतर सहाही तालुक्यातील पोलीस पाटलांनी मिळून शुक्रवारी सहाशेपेक्षा अधिक लोकांची माहिती संकलित करून ती तहसीलदारांकडे सादर केली. ही मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.