CoronaVirus: Another 35 positive in Washim district; 53 corona free | CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी ३५ पॉझिटिव्ह; ५३ कोरोनामुक्त

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी ३५ पॉझिटिव्ह; ५३ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरूवार, १ आॅक्टोबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ४४१६ वर पोहोचली आहे. दरम्यान गुरूवारी ५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या अतिशय झपाट्याने वाढली. आॅक्टोबरच्या पहिल्या दिवशी ३५ रुग्ण आढळून आल्याने पहिला दिवस काही अंशी दिलासादायक ठरला. गुरूवारी वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील ३, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, योजना पार्क येथील १, धुमका येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव शहरातील जाट गल्ली येथील १, इतर ठिकाणचे ३, अमानी येथील १, मैराळडोह येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, इतर ठिकाणचा १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, हराळ येथील १, जांब आढाव येथील १, कळंबा बोडखे येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील मोझरी येथील १, मानोरा शहरातील १, वसंतनगर येथील ४, कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव येथील १, भामदेवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
 

 

 

 

 

Web Title: CoronaVirus: Another 35 positive in Washim district; 53 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.