शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

कोरोना संसर्गात पुन्हा होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 5:08 PM

CoronaVirus जानेवारी महिन्यातील उत्तरार्धात कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोना संसर्गाचे प्रमाण घटल्याने दिलासा वाटू लागला असतानाच जानेवारीत कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे दिसते. त्यातही जानेवारी महिन्यातील पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १ ते २३ जानेवारीपर्यंतच्या एकूण ३३७ बाधितांपैकी १४० जण १६ ते २३ जानेवारीदरम्यानच्या तिसºया आठवड्यातच आढळून आले आहेत. विशेष म्हणजे वातावरणात उष्णता वाढत असताना कोरोना संसर्गाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. तथापि, पुढील तीन महिने कोरोना संसर्गाने फारसा वेग घेतला नाही; परंतु जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांदरम्यानच जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला. आॅक्टोबरच्या उत्तरार्धापासून मात्र कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला. थंडीच्या काळात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना याच कालावधित कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आता मात्र थंडीचे प्रमाण कमी होत असताना कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात जानेवारी महिन्यात २३ दिवसांत वाशिम जिल्ह्यात एकूण ३३७ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १४० लोकांना १६ ते २३ जानेवारी या आठ दिवसांतच कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या