इंझोरीत कोरोना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:53+5:302021-03-18T04:41:53+5:30
जिल्हाभरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. गत काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या मानोर तालुक्यातील इंझोरी येथेही दोन दिवसांपूर्वी एक ...

इंझोरीत कोरोना चाचणी शिबिर
जिल्हाभरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. गत काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या मानोर तालुक्यातील इंझोरी येथेही दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इंझोरीत व्यावसायिकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी बुधवारी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १२६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. या शिबिरासाठी आरोग्य केंद्र कुपटाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. सुधीर खिराडे, आरोग्य सहायक श्रीरंग कानडे, आरोग्य सेवक सुनील तायडे यांच्यासह आशासेविकांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी मंडळ अधिकारी देवीदास काटकर, ग्रामसेवक, पोलीस पाटील दुर्योधन काळेकर यांनी सहकार्य केले.