कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ८६ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:06+5:302021-06-05T04:29:06+5:30
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची अपेक्षित फलश्रुती ...

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ८६ बाधित
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची अपेक्षित फलश्रुती आता दिसायला लागली असून, २८ मे नंतर सातत्याने केवळ दोनअंकी रुग्णसंख्या असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. हे चित्र असेच कायम राहिल्यास लवकरच जिल्हा पूर्णत: कोरोनामुक्त होईल, असा आशावाद सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहर व तालुक्यात २५, मालेगाव तालुक्यात ४, रिसोड तालुक्यात ७, मंगरूळपीर तालुक्यात २४, कारंजा तालुक्यात २१; तर मानोरा तालुक्यातील रामतिर्थ येथे केवळ एक रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील चारजणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
.......................
संकट टळलेले नाही, नियमांचे पालन करा
कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून परिणामकारक घट झाली आहे. असे असले तरी, हे संकट पूर्णत: टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून स्वत:सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहे.
..................
कोरोनाबाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४०४३९
ॲक्टिव्ह – १३६३
डिस्चार्ज – ३८४८६
मृत्यू – ५८९