Corona Cases in Washim : आणखी सहा जणांचा मृत्यू; ५८८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:46 IST2021-05-13T18:46:49+5:302021-05-13T18:46:56+5:30
Corona Cases in Washim: गुरूवार, १३ मे रोजी आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ५८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : आणखी सहा जणांचा मृत्यू; ५८८ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरूवार, १३ मे रोजी आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ५८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४०२९ वर पोहोचला आहे.
गुरूवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली. एकूण ५८८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १०७, मालेगाव तालुक्यातील ८३, रिसोड तालुक्यातील ५१, मंगरूळपीर तालुक्यातील ८७, कारंजा तालुक्यातील ११७ आणि मानोरा तालुक्यात १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३५ बाधिताची नोंद झाली असून ५८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.