शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राकाँ नेत्यांचे वागणे नटसम्राटासारखे

By admin | Updated: October 9, 2014 01:48 IST

नितीन गडकरी यांची अकोट येथील जाहीरसभेत टीका

आकोट : निवडणुका आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नटसम्राटासारखे वागतात. नाटकातील भाडोत्री पात्राप्रमाणे शाहू, फुले, आंबेडकरांची नावं घेत सहानुभूतीच्या आधारावर सत्ता मिळवतात. मग मात्र जनतेची लूट करीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.आकोट येथे भाजपच्या प्रचार सभेत बोलताना गडकरी म्हणाले, काँग्रेस, राकाँमध्ये घराणेशाही आहे; परंतु भाजपमध्ये घराणेशाहीला पायबंद घातला जात आहे. भाजपची भूमिका दहशतवाद, भ्रष्टाचार व पाकिस्तानच्या विरोधात आहे; मात्र, काँग्रेस-राकाँची मंडळी मोदींचा अपप्रचार करून मुस्लीम समाजाला भीती दाखवित आहेत. आघाडी सरकारने कोट्यवधी रुपये सिंचनावर खर्च केले; परंतु सिंचन झाले नाही. आकोट तालुक्यात सिंचनाचा पैसा नेमका कुणी खाल्ला, हा संशोधनाचा विषय आहे. पंडित नेहरूंपासून काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत आहे; परंतु राहुल गांधींपर्यंतही गरिबी हटली नाही. उद्योगधंदे व प्रगती नसल्याने मोठय़ा प्रमाणात बेरोजगार निर्माण झाल्याचा आरोप गडकरी यांनी केला.व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणजित पाटील, संघटन मंत्री रामदास आंबटकर, प्रकाश भारसाकळे, संतोष झुनझुनवाला, नयना मनतकार, डॉ. जगन्नाथ ढोणे, राजू नागमते, योगेश नाठे, संदीप उगले, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, तेल्हारा नगराध्यक्ष कान्होपात्रा फाटकर, नानासाहेब भिसे, नलिनी भारसाकळे, रूपाली भारसाकळे, ओम सुईवाल, रमेश दुतोंडे, स्मिता राजनकर, हाजी आरीफ हुसेन मुल्लाजी, डॉ. गजानन महल्ले, जयंत पोटे, बाळासाहेब भांडे व भाजपचे जि.प., पं.स., न.प. सदस्यांची उपस्थिती होती.