शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात काँग्रसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

उपविभागीय अधिका-यांना निवेदन.

कारंजालाड (जि. वाशिम) : केंद्रात व राज्यात असणार्‍या भाजपा सरकारचा निषेध करून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येवून उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अल्पसंख्यांक तथा दलितांचे हित न साधता उद्योजकांना हे सरकार फायदे देत आहे. या धरणे आंदोलनात कमिटीने यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत करावी, सरसकट कर्ज माफ करावे, पूर्णपणे वीज बिल माफ करावे, केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादने कायद्यातील शेतकर्‍यावरील अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात याव्यात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, केशरी शिधापत्रिकाधारकांना ५ रूपये किलो तांदूळ व १0 रूपये किलो गहू शासकीय दराने देण्यात येत होते ती योजना पूर्ववत करावी, रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा, मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, शेतमालाला उच्च दर्जाचा भाव देण्यात यावा, गुरांसाठी चारा डेपो उघडावेत तथा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.