शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातील देयकाच्या अदायगीत अनियमितताप्रकरणी संबधितावर होणार गुन्हे दाखल

By admin | Updated: April 13, 2017 15:33 IST

या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पञ बनवून येत्या दोन दिवसात दोषींवर गुन्हे दाखल होतील अशी माहीती गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी गुरुवारी दिली.

मंगरुळपीर -तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत मनरेगाच्या कुशल कामामधील अदायगीमध्ये तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी येवतेकर आणी सहाय्यक लेखा अधिकारी जगताप यांनी  ४४ लाख,४१ हजार, ६८० रुपये बिलामध्ये अनियमितता केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी सबंधीत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही अद्याप प्रकरण गुलदस्त्यातच असल्याने या प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. आता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पञ बनवून येत्या दोन दिवसात दोषींवर गुन्हे दाखल होतील अशी माहीती गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी गुरुवारी दिली.      मनरेगाअंतर्गत पंचायत समिती मंगरुळपीर येथील कुशल कामाच्या अदायगीत तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी येवतीेकर आणी सहाय्यक लेखा अधिकारी जगताप यांनी अनियमितता केल्याचे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आल्याने सबंधीत दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करन्याचे आदेश दिनांक ३ नोव्हेंबरला दिले होते; परंतु आतापर्यतही सबंधीत दोषीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. सदर प्रकरण हेतुपुरस्सर गेल्या चार महिन्यापासुन दडवून ठेवण्यात आल्याने मुख्याधिकार्ऱ्यांच्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करुन योग्य कारवाई करावी या मागणीसाठी मंगरुळपीर येथील शिवसेना आक्रमक झाली होती. दोषीवर गुन्हे दाखल न केल्यात तिव्र आंदोलन छेडल्या जाईल असा ईशारा शिवसेनेने दिला होता.  यावर मंगरुळपीर येथील प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी लिपिक गांजरे यांना सूचना करुन गुन्हे नोंदविण्याबाबतचे पञ काढून पुढील कारवाईची प्रक्रिया दोन दिवसात करण्यात येईल असे सांगितले.