नुकसानभरपाईसाठी शेतक-यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, ४८ तासांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:51 IST2018-02-14T15:51:18+5:302018-02-14T15:51:45+5:30
सर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी...

नुकसानभरपाईसाठी शेतक-यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, ४८ तासांची मुदत
वाशिम - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी चंदन खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांनी बुधवारी केले.
लहरी हवामान, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे होणाºया पीक हाणीची भरपाई शेतकºयांना मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलेली आहे. या योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज, गारपीट, चक्रीवादळ, पुर व भुस्खलन, दुष्काळ, पाऊस खंड, किड व रोग, पेरणी व लावणी न झाल्याने होणा-या पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबीचा विचार करुन जोखीमस्तर ठरविण्यात येतो. रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना जोखीमस्तरानुसार भरपाई मिळणार आहे. त्यासाठी संबंधित शेतक-यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून चंदन खोब्रागडे यांच्यावर जबाबदारी असून, संबंधित शेतकºयांनी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ८४११८८६१७२ या क्रमांकावर एसएमएसद्वारे किंवा व्हॉटस्अॅपद्वारे विमा भरल्याची पावती टाकून ४८ तासाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी रब्बी हंगामात पीक विमा उतरविला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील केवळ सहा हजार ५०० शेतकºयांनी विमा उतरविला आहे. विमा कंपन्यांकडून लादलेल्या जाचक अटी, भरपाई मिळण्यास होणारा विलंब व दाद मागण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचा दावा शेतकºयांनी केला. कर्जदार शेतकºयांना पीक विमा उतरविणे बंधनकारक असते. मात्र, वेळेवर कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने बहुतांश शेतकºयांना रब्बी हंगामात पीक विमा उतरविता आला नाही तसेच रब्बी हंगामात पीककर्ज काढणाºया शेतकºयांची संख्याही खरिप हंगामाच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे पीक विमा उतरविण्यात कर्जदार शेतकºयांची संख्याही कमी आहे.