शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

बीएडच्या सामाईक सीईटीमुळे महाविद्यालयांची धांदल

By admin | Updated: April 15, 2017 00:56 IST

मार्गदर्शन वर्गांचे आयोजन: अर्ज दाखल करण्याची मुदत २६ एप्रिल

नाना देवळे - मंगरुळपीर राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने आता बीएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्यभर एकच सीईटी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षणसंस्थांच्या वतीने या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा बंद करण्यात आली असून, राज्यभरात होणाऱ्या आॅनलाइन पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आगामी २६ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांची धांदल सुरू आहे. राज्यात यापूर्वी बीएड अभ्यासक्रमासाठी दोन वेगवेगळ्या प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जात असत. त्यामध्ये शासकीय महाविद्यालये आणि शासनाशी संलग्न असलेल्या खासगी महाविद्यालयांची स्वतंत्र सीईटी घेतली जायची, तसेच शासनाची मान्यता असलेल्या; परंतु संलग्नित नसलेल्या खासगी संस्थाकडून वेगळी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जायची; परंतु मागील वर्षांपासून बीएड अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा करण्यात आला. उच्चशिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती सर्व संबंधित महाविद्यालयांना कळविली असून, यासाठी खासगी शिक्षण संस्था आणि शासनाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमार्फत एकच सीईटी घेण्याचे ठरले आहे. राज्यभर १३ आणि १४ मे रोजी बीएड प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बीए, बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असलेले विद्यार्थीही या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज सादर करू शकणार आहेत. वाशिम जिल्ह्यात बीएड अभ्यासक्रमाची पाच महाविद्यालये आहेत. आता उच्च शिक्षण विभागाने बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेबाबत केवळ आॅनलाइन माहिती महाविद्यालयांना पाठविली असून, खासगी बीएड महाविद्यालयांकडून या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे.बीएड प्रवेशपूर्व आॅनलाइन परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती कशी देणार, हा प्रश्न पडला आहे. शासनाने यावर्षीपासून राज्यात एकाच वेळी सीईटी परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यामुळे परीक्षेबाबत विभागाने विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करणे आवश्यक असून, आमच्या स्तरावर आम्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत आहोत.-ओमप्रकाश झिमटे (प्राचार्य),यशवंतराव चव्हाण बीएड कॉलेज, मंगरुळपीर