नियोजन भवनातील राडाप्रकरणी पाटणी, गवळींवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:47+5:302021-02-05T09:24:47+5:30
.................... बॉक्स : दोन्ही पक्षांमधील २० कार्यकर्त्यांवर कारवाई खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झाल्याचे पडसाद ...

नियोजन भवनातील राडाप्रकरणी पाटणी, गवळींवर गुन्हा दाखल
....................
बॉक्स :
दोन्ही पक्षांमधील २० कार्यकर्त्यांवर कारवाई
खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झाल्याचे पडसाद २६ व २७ जानेवारी रोजी जिल्हाभरात उमटले. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, प्रतिमेचे विद्रुपीकरण, व्यापारपेठ बंद करणे यासारखी आंदोलने केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी भाजप व शिवसेनेतील प्रत्येकी १० कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेशान्वये कलम १३५ची कारवाई केली. आपसातील वाद सामंजस्याने मिटवा, कोणीही जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे वाशिम शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांनी सांगितले.
.......................
बॉक्स :
...अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही - परदेशी
भावना गवळी आणि राजेंद्र पाटणी यांनी परस्परांविरुद्ध वाशिम शहर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारींवरून दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करावे. जाळपोळ किंवा अन्य स्वरूपातील आंदोलने करून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला आहे.