नाफेड अंतर्गत सोयाबीन व कापुस खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 07:27 PM2017-10-24T19:27:18+5:302017-10-24T19:27:31+5:30

मंगरुळपीर :  नाफेड केंद्रांमार्फत शेतक-यांच्या सोयाबीन व कापसाची शासनाने खरेदी करावी अशी मागणी २३ रोजी शिवसेनेचेवतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत  मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Buy soybean and cotton under Nafed | नाफेड अंतर्गत सोयाबीन व कापुस खरेदी करा

नाफेड अंतर्गत सोयाबीन व कापुस खरेदी करा

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : जिल्हाधिका-यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर :  नाफेड केंद्रांमार्फत शेतक-यांच्या सोयाबीन व कापसाची शासनाने खरेदी करावी अशी मागणी २३ रोजी शिवसेनेचेवतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत  मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद आहे की, विदर्भात शेतक-यांची शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबुन आहे. यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने शेतक-यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकीकडे उत्पादन घटले, असतांना बाजारपेठेत पिकांना अल्प दर आहे. निवडणुकीपुर्वी आपण शेतक-यांना उत्पन्न मुल्यासोबत ५० टक्के नफा देणयाचे आश्वासन दिले होते, परंतु ते शक्य नसल्यास नाफेड केंद्रामार्फत त्वरित कापुस व सोयाबीनची  खरेदी सुरु करावी व शेतकºयांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली ओह. 

Web Title: Buy soybean and cotton under Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.