शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:39 IST

Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतभर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या इन्स्टाग्राम, फेसबुक या ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. त्यामुळे अपरिचितांची ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारण्यापूर्वी सारासार विचार करावा तथा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सावध राहावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुकवर सक्रिय असणाऱ्या नागरिकांना अपरिचित मुलींकडून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. ती स्वीकारल्यास हाय, हॅलो होऊन अश्लील व्हिडीओ कॉल घेण्याकरिता विनंती केली जाते. या विनंतीचाही स्वीकार केल्यास समोरून अश्लील व्हिडीओ दाखविण्यात (चेहरा न दाखविता) येतो. हा प्रकार दोन-तीन वेळा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती समोरून तुम्हीही अश्लील व्हिडीओ कॉल करा, अशी विनंती करते. तथापि, फसवणूक व्हायला नेमकी येथूनच सुरुवात होते. ओघाओघात चेहरा दाखवून अश्लील व्हिडीओ कॉल केल्यास तीच रेकॉर्डिंग अवघ्या काहीच वेळानंतर परत पाठवून धमकीचे कॉल्स सुरू होतात. पैशांची मागणी पूर्ण करा; अन्यथा यू-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करून बदनामी करू, असा इशारा दिला जातो. यू-ट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्याचे सांगून तो रिमूव्ह करण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारे राज्यातील शेकडो इन्स्टाग्राम, फेसबुक वापरकर्ते गेल्या काही महिन्यांत ‘ब्लॅकमेल’ झाले असून बदनामीच्या भीतीपोटी कारवाई करण्यास अनेक जण धजावत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रामुख्याने इन्स्टाग्राम, ‘फेसबुक’ या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ कॉल्स करून ब्लॅकमेल केले जात असल्याची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस येत आहेत. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासन व सायबर सेलकडून जनजागृती करणे सुरू आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगून कुठल्याही अपरिचित व्यक्तीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवू नये किंवा स्वीकार करू नये, हाच त्यावरील प्रभावी पर्याय आहे.- वसंत परदेशी,  जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

नागरिकांनी फसवणूक टाळण्याकरिता फेसबुक, इन्स्टाग्रामच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसीचा पर्याय निवडून अनोळखी व्यक्ती फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविणार नाही किंवा फॉलो करणार नाही, असा बदल करा. अनोळखी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका किंवा व्हिडीओ कॉल घेऊ नका. - दीपक घुगे,  सायबर सेल, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcyber crimeसायबर क्राइम