शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अंध मुलांनी कमाविले ५५ हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:18 IST

प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने राख्यांची निर्मिती करुन त्याची विक्री करण्याची अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेकतउमरा   :  नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असताना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने राख्यांची निर्मिती करुन त्याची विक्री करण्याची अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली आहे. यामधून त्यांनी चक्क ५५ हजार रुपयांची कमाई केल्याचे चेतन सेवांकुर मध्ये राहिलेल्या अंध चेतन उचितकर यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी दिली.येथून जवळच असलेल्या केकतउमरा येथील रहिवाशी चेतन पांडुरंग उचितकर, लक्ष्मी बळीराम वाघ, प्रविण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुन गोडघासे, तुलशीदास श्रीकांत तिवारी, रुपाली सोपान फुलसावंगी व गौरव गजानन मालक या अंधांनी डोळसांवर मात करीत स्वहस्ते राख्या निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. संगित कलेच्या माध्यमाने उपजिविका चालविणाºया चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनचे दृष्टीहीन अंध सदस्यांनी  राख्या बनवून त्यांची विक्री करावी आपली उपजिविका चालवावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला .  राख्या तयार झाल्यानंतर त्यांनी वाशिम, नागपूर, औरंगाबाद येथे त्याची विक्री केली. अनेक सामाजिक संघटना, शिक्षणसंस्थांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतूक करुन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावीत राख्या खरेदी केल्यात. एकीकडे रोजगार नाही अथवा शेतात उत्पन्न नाही या कारणावरुन शिक्षित अशिक्षित लोक आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. तर दुसरीकडे जन्मताच जीवनात अंधार असताना हिम्मत न हारता जिद्द, चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद बाळगून डोळसांना लाजविणारी कामगिरी दहा वर्षीय चिमुकला चेतन उचितकर व त्याचे अंध सहकारी मित्र करीत आहेत. चेतन व त्याचे सहकारी संगितमय आॅस्क्रेस्टा चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करीत असून चेतन याने आतापर्यंत सुमारे ४५0 कार्यक्रमांद्वारे शेतकरी आत्महत्या , नेत्रदान, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाओ यासारख्या सामाजिक उपक्रमावर तसेच ज्वलंत प्रश्नांवर जनजागरण करुन समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी