शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना कार्यकर्ते रस्त्यावर; शहराला पाेलीस छावणीचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:40 IST

BJP-Sena workers on the streets : भाजपा कार्यालयाकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना अटक

ठळक मुद्देभाजपाचे नेते किरीट साेमय्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार हाेते. तत्पूर्वी त्यांनी देगाव येथील पार्टीकल बाेर्डची पाहणी व बंद असलेल्या रस्तयाच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले.

नंदकिशाेर नारेवाशिम :  भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी खा. भावना गवळी यांच्या  संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत जे प्रकरण चाैकशीत आहे या प्रकरणाबाबत केलेले वक्तव्यामुळे  शिवसैनिकांमध्ये माेठया प्रमाणात राेष हाेता. किरीट साेमय्या जिल्हा दाैऱ्यावर असल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता पाहता शहरात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवल्याने शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले हाेते. यावेळी दाेन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले.

भाजपाचे नेते किरीट साेमय्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार हाेते. तत्पूर्वी त्यांनी देगाव येथील पार्टीकल बाेर्डची पाहणी व बंद असलेल्या रस्तयाच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले. परंतु तेथे जाताच त्यांच्या वाहनावर दगडफेक व  शाई फेक झाल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. त्यानंतर वाशिम येथे असलेल्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सर्वत्र तसेच शहरातील विविध भागात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. पत्रकार परिषद सुरु हाेण्यापूर्वी काही शिवसैनिक भाजपा कार्यालयाकडे येत असतांना मधातच पाेलिसांनी त्यांना राेखले व अटक केली. आज शहरात सर्वत्र पाेलीस बंदाेबस्त चर्चेचा विषय ठरला.दाेन्ही पक्षाच्या कार्यालयासमाेर तगडा बंदाेबस्तजिल्हयात भाजपा नेते किरीट साेमय्या येणार असून यापूर्वी त्यांनी  व्यक्त केलेल्या मताने शिवसैनिक चांगलेच आक्रमक असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपा व शिवसेना दाेन्ही पक्ष कार्यालयाठिकाणी कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता.  भाजपा कार्यालय असलेल्या पाटणी कमर्शियलमध्ये प्रवेश करणारे काही प्रवेशव्दार बंद ठेवून पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. जिल्हयात पाेलीस कडक बंदाेबस्त असतांनाही मात्र देगाव येथे अनुचित प्रकार घडून आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाwashimवाशिमPoliceपोलिसKirit Somaiyaकिरीट सोमय्या