भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 04:39 PM2019-09-04T16:39:34+5:302019-09-04T16:39:46+5:30

भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  

BJP government leaves farmers in the wind - Nana Patole | भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : शेतमालाला समाधानकारक भाव नाही, पीक विम्याचा लाभ नाही, कर्जमाफीत असंख्य चुका यासह भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: वाºयावर सोडले, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी मालेगाव येथे बुधवारी महापर्दाफाश यात्रेला संबोधित करताना केली.  
मालेगाव बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित महापर्दाफाश यात्रेला आमदार अमित झनक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, डॉ. श्याम गाभणे, बाजार समिती सभापती किसनराव घुगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकºयांना मिळालेले नाहीत. देश आर्थिक संकटात सापडला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने केवळ ३५० कोटी रुपयांमध्ये देशात स्थिरता आणून  रस्ते, वीज, शाळा व अन्य सुविधा उपलब्ध करून शक्तिशाली देश तयार केला. आता मात्र विद्यमान सरकारच्या एकहाती सत्ता असूनही देश आर्थिक संकटात सापडला आहे. भाजपा सरकारने जनतेला फसवण्याचे काम केले असून भुलथापा मारणारे सरकार उखडून फेका, असे आवाहनही पटोले यांनी केले. प्रास्ताविक शाम उमाळकर यांनी तर संचालन व आभार रामेश्वर पवार यांनी केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: BJP government leaves farmers in the wind - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.