दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:41 PM2020-03-14T13:41:49+5:302020-03-14T13:41:58+5:30

शेख नासिर शेख निसार (२७) रा. भडशिवनी असे मृतकाचे नाव आहे.

The bike hit the divider; One killed | दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार

दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार

Next

कारंजा लाड : कारंजा मंगरूळपीर मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील रस्ता दुभाजकावर दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. शेख नासिर शेख निसार (२७) रा. भडशिवनी असे मृतकाचे नाव आहे.
कारंजा तालुक्यातील भडशिवनी येथील दोघेजण एम एच ३७ डी ४२७८ क्रमांकाच्या दुचाकीने शेलुबाजारवरून घरी परतत असतांना मार्गात रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील कारंजा ते मंगरूळपीर मार्गावर असलेल्या रस्ता दुभाजकावर दुचाकी धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात शेख नासिर शेख निसार रा. भडशिवनी हा जागीच ठार झाला तर सुमित गणपत लिंगाटे (३४) रा. भडशिवनी हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिका चालक शाम घोडेस्वार यांनी रूग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. मृतक शेख नासिर शेख निसार याच्यावर भडशिवनी येथे १३ मार्च रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कारंजा शहर पोलीसांनी या घटनेची नोंद घेण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The bike hit the divider; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.