वाशिम जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:20 IST2021-09-27T18:20:26+5:302021-09-27T18:20:39+5:30
Bharath bandh in Washim : प्रमुख शहरांमध्ये मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

वाशिम जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद!
वाशिम : शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावे, शेतमालाला न्यूनतम समर्थन मूल्यावर खरेदीची खात्री द्यावी, नविन विज संशोधन विधेयक परत घ्यावे, नवे श्रमीक कायदे मागे घ्यावे, बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची हमी द्यावी, कार्पोरेट हितकारी निती लागू करणे बंद करावे, इंधन दरवाढ, खाद्य तेलाचे भाव ५० टक्के कमी करावे यासह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकºयांच्यावतीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात वाशिम शहरासह प्रमुख शहरांचा अपवाद वगळता ग्रामीण भागात काही ठिकाणी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख शहरांमध्ये मात्र या बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.