शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही काळाची गरजच

By admin | Updated: February 14, 2015 02:01 IST

‘लोकमत’ परिचर्चेतील सूर; स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याची नितांत गरज.

कारंजा (जि. वाशिम) : देशात मुलाच्या संख्येच्या प्रमाणात मुलींच्या संख्येत घट होत आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्त्री भ्रूणहत्येविरोधातील बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेबाबत परिचर्चेच्या माध्यमातून जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. स्त्रीयांची स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणारी ही मोहीम निश्‍चितच स्वागतार्ह असल्याचा निष्कर्ष त्यामधून निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा येथे २३ जानेवारीला ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. देशातील दर हजारी मुलांमागे मुलींच्या जननसंख्येत वाढ व्हावी, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार १९७१ मध्ये भारतात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९६४ होते, तर २0११मध्ये हेच प्रमाण ९१८वर पोहोचले. २00१ ते २0११ या दरम्यान हे प्रमाण देशातील अनेक जिल्ह्यांत खाली आलेले दिसले. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात एक कोटी २0 लाख मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. पंचायत समिती सभापती वर्षाताई नेमाणे, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा सविता मोरे, उपाध्यक्ष मंजुशा पिंपळशेंडे, प्रया बाणगांवकर परिचर्चेत सहभागी झाल्या होत्या. ही मोहिम राबविताना जनतेकडून योग्य सहकार्य लाभणे अपेक्षित आहे, तसेच शासनानेही ही मोहिम राबविताना थोडी ताठर भूमिका घ्यायला हवी. असे मत मान्यवर महिलांकडून लोकमतच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले.